धाराशिव (प्रतिनिधी)-   इंडसइंड बँकेसोबत एक व्यवसाय कल्पना स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली. जिथे जिल्हाभरातील 19 संस्थांकडून 164 कल्पना सादर झाल्या. स्पर्धेत एकूण 9 विजेते दिनांक 31 डिसेंबर,2025 रोजी जाहीर झाले. त्यापैकी 7 विद्यार्थी तेरणा महाविद्यालयाचे होते. पहिले, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार अनुक्रमे शेख समीर, निखिल मैदाड आणि शेख नयूम व गायत्री मोरे यांना मिळाले. तर हर्षराज पाटील, अमोल काळदाते आणि अंकिता शिंदे यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचाही सर्व स्तरावर गौरव करण्यात आला. 

या विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांची रूपांतर प्रोटोटाइप मध्ये फोटो प्रोटोटाइचे रूपांतर बिझनेस मॉडेलमध्ये करण्यासाठी सर्वतोपरी भारतीय युवाशक्ती ट्रस्ट व तेरणा पब्लिक ट्रस्ट संचालित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मेंटॉर देउन मदत करून उद्योजक करणार आहे.  

या कार्यक्रमास उद्योजक हनुमंत मडके, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र साळुंके, प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, उद्योजक संजय देशमाने, तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, टीपीओ अशोक जगताप, डॉ. सुशील होळबे तसेच इंडसइंड बँकेचे अधिकारी हजर होते.

प्राचार्य डॉ. माने यांनी स्पष्ट केले की, “तेरणा महाविद्यालय स्टार्टअप संस्कृतीसाठी नेहमीच प्रयत्नरत असून भविष्यात आमचे अनेक विद्यार्थी या क्षेत्रात यशगाथा लिहितील. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनीही या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 
Top