कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, येरमाळा येथे हॉर्टिकल्चर आणि अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “उद्योजकता कौशल्य विकास“ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. कमलताई कुंभार (रा. हिंगळजवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) या यशस्वी उद्योजिकेने विद्यार्थ्यांना “यशस्वी उद्योजक कसे बनावे“ याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकामध्ये दडलेल्या कौशल्यांची उकल करून आत्मनिर्भर होण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. “जिद्द, मेहनत, चिकाटी आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करणे हे यशाचे गमक आहे,“ असे त्या म्हणाल्या.
कमलताई कुंभार या भारतीय सामाजिक उद्योजक असून ‘कमल पोल्ट्री’ आणि ‘एकता प्रोड्युसर कंपनी’च्या संस्थापक आहेत. पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेस चालना देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन 2021 मध्ये सीसीआय फाउंडेशनचा सर्वोच्च नागरी ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. प्रा.बुधवंत सर यांनीही विद्यार्थ्यांना फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व सांगितले व आधुनिक शेती ला प्राधान्य द्यावे हे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब (जि. धाराशिव) येथील डॉ. अनंत नरवडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या कौशल्यांचे व तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय कांबळे (सदस्य, अधिसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, उपप्राचार्य भोसले हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे आयोजन हॉर्टिकल्चर विभागप्रमुख डॉ. हेमंत चांदोरे व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी जाधव यांनी केले. सह-संयोजक म्हणून राम दळवी, डॉ. लक्ष्मण सुरुनर यांचेही योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दादाराव गुंडरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत भोसले यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. देवकते, प्रा. पाटील, प्रा. गपाट, प्रा. टिंपरसे, प्रा. कदम, डॉ. सरवदे, डॉ. लोहकरे, प्रा. काकडे, डॉ. पंडित, प्रा. खोशे, प्रा. घाटपारडे, प्रा. बोंदर, प्रा. आडसुळ, प्रा. खंडागळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. साकोले, डॉ. साठे, डॉ. अदाटे, डॉ. चिंते, डॉ. ढोले,प्रा. मुखेडकर,डॉ. वाकडे, डॉ. मानेकर, डॉ. वाघमारे, प्रा. शिंपले, प्रा. पालखे, प्रा. शेख, प्रा. गाझी व डॉ. सूर्यवंशी, यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये निबंधक श्री. हनुमंत जाधव, बंडगर , संतोष मोरे,उमेश साळु़ंखे, अर्जुन वाघमारे यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
