धाराशिव  (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रा. डॉ. राजकुमार पवार यांनी वरील उद्गार काढले. मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी  या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार मांडत असताना त्यांनी मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या विविध रोजगारांच्या संधी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने प्राप्त कराव्यात याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर मराठी भाषा ही माणसाच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख माध्यम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय व संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडताना डॉ. पवार यांनी जाहिरात लेखन, वर्तमानपत्र, सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखत कौशल्य, आकाशवाणी, दूरदर्शन, विविध समाजमाध्यमे त्याचबरोबर परदेशीय कंपन्यांमध्ये निवेदक, जनसंपर्क अधिकारी अशा कितीतरी संधी मराठी भाषिकांना आज वर्तमनात उपलब्ध झालेल्या आहेत. मुलांनी काळाची पावले ओळखून मराठी भाषेचा उपयोग करून घ्यावा. असा बहुमोल विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडला. अत्यंत अभ्यासपूर्ण व विद्यार्थी हिताचे विचार त्यांच्या व्याख्यानांमधून त्यांनी अभिव्यक्त केले. 

अध्यक्षीय समारोप करताना प्रा. राजा जगताप यांनी मराठी भाषेमुळेच मी कसा घडत गेलो हे विद्यार्थ्यांसमोर मांडले. मराठी भाषेनेच मला लेखक केले, मराठी भाषेनेच मला प्राध्यापक केले, मराठी भाषेमुळेच मी बोलायला शिकलो अशी स्वतःची उदाहरणे सामोरे ठेवून विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी व व्यक्तिमत्व विकासासाठी भाषा कशी आवश्यक आहे याविषयीचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. वैशाली बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागाचे प्रा. सुशील जाधवर, प्रा. सौ. सुवर्णा गेंगजे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मारुती लोंढे, हिंदी विभागाच्या प्रा. स्वाती देडे, प्रा. ओव्हाळ , प्रा. अंगारखे या उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्तेही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top