कळंब (प्रतिनिधी)- विद्या भवन हायस्कूल कळंब प्रशालेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही जी, उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही एस, पर्यवेक्षक श्रीमती कोळी जे एन यांच्या हस्ते करण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे 50 स्टॉल लावण्यात आले होते .या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. कमवा व शिका यातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान, खरेदी-विक्री ,ग्राहकाशी संवाद कौशल्य हे विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. प्रशालेतील शिक्षक सुशील कुमार तीर्थकर , विनोद सागर, जिंदमवार एन डी, महेश माळवदकर,आप्पासाहेब वाघमोडे, संजय मडके शहाजी माने, संदीप पाटील ,बंडू काळे ,अकबर शेख, विशाल पवार , शरद टोपे, चव्हाण सर ,रवी कोल्हे, बाल आनंद मेळाव्यासाठी परिश्रम घेतले . प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख पवार एस.जे यांनी केले.
