धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला,अधिष्ठाता डॉ शैलेंद्रजी चौहान व अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी लाकाळ यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडविण्यात आला.
राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्य गीत गायण्यात आले. अधिष्ठाता शैलेंद्र चौहान यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत महाविद्यालयातील आरोग्य योजनेची व रुग्ण सेवा,आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण,नविन कोर्सेस बद्दल माहिती दिली,आजचा दिवस हा संविधानामुळे असुन संविधाना विषयी मार्गदर्शन केले. उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर,सिस्टर, विद्यार्थी,सुरक्षा रक्षक कर्मचारी सह इतर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थींनीचे देशभक्ती पर गीत झाले. विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची माहिती व अधिकार यावरील पथनाट्यातुन सादरीकरण केले. महाविद्यालयाच्या इमारतीवर व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई व रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव सुरक्षा समिती सदस्य अब्दुल लतीफ,सदस्य गणेश वाघमारे, आरोग्य मित्र शेख रौफ, पिएसआय नजिरोद्दीन नाईकवाडी, सुनिल जोगदंड, जावळे, बाळासाहेब मुरकुटे महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.स्मिता सरवदे गवळी, उपवैद्यकिय अधिष्ठाता डॉ शफिक अहमद मुंढेवाडीकर, डॉ.नोमाणी शेख, डॉ.प्रविण डुमणे, डॉ.विवेक कोळगे,इन्चार्ज मिसार,मेट्रान सुमित्रा गोरे, स्टाफ नर्स मिना गोरे,नदाफ मॅडम, सिध्दार्थ जानराव, यशवंत गोरे,सह इतर मान्यवर उपस्थित होते,तर सुरक्षा समितीच्या वतीने देखिल भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
