धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा सह व्यावसायिक शिक्षणाचे  शालेय जीवनातच धडे मिळावेत , यासाठी आनंदमेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते .

या  आनंदमेळाव्याचे उद्धाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . दयानंद जटनुरे  यांच्या हस्ते झाले .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक आरंभचे मुख्यसंपादक चंद्रसेन देशमुख, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी निकिता पवार,शहरातील सर्व वसतिगृहाचे चालक  मनोज कवडे, वैजिनाथ खोसे, नरसिंह पाटील, गोविंद चव्हाण, राहूल शेंडगे, आदित्य उंबरे, लक्ष्मण भोसले,पोलिस दिपक पाटील, माजी शिक्षक नागनाथ गोरसे तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील ,प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख,  प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे , श्रीमती बी .बी . गुंड , बी .एम .गोरे, प्रा . विनोद आंबेवाडीकर, क्रीडा विभाग प्रमुख प्रवीण बागल, पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आनंदमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येमुळे  सकाळ व दुपार सत्रात भरविण्यात आला होता.   तसेच या आनंदमेळाव्यात गुरुवर्य के .टी . पाटील  फाऊडेंशन वर्गाचे 25 स्टॉल यात सहभागी होते.

या आनंदमेळाव्यात  तब्बल 600 विविध खादय पदार्थांचे व इतर साहित्याचे स्टॉल विद्यार्थ्यांनी  लावून व्यवसाय कसा करावा. याचे प्रशिक्षणच या माध्यमातून घेतले . उत्पादन ,विक्री ,नफा -तोटा या बाबतीचे अनुभव या माध्यमातून त्यांना मिळाला. या आनंदमेळाव्यात लाखो रुपयाची उलाढाल झाली. या आनंदमेळ्यासाठी   सर्व शिक्षकशिक्षिका व सेवक नाईक सुहास ताटे व सेवक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 
Top