वाशी (प्रतिनिधी)-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे जगदाळे महाविद्यालय,वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ मौजे घाटपिंप्री ता.वाशी येथे गुरुवारी(दिनांक 08)रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचेप्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार बापू शितोळे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मांगले, पोलिस पाटील शंकर आहिरे, माजी सरपंच चंद्रकांत सातपुते,मुख्याध्यापक महादेव भैरट,जयचंद सातपुते सर आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनंत पाटील,प्रा.डॉ दैवशाला रसाळ व प्रा.डॉ नेताजी देसाई उपस्थित होते.

या वेळी बोलताना जयकुमार बापू शितोळे म्हणाले कि, विद्यार्थांमध्ये शिबिरांमधून आत्मसन्मान वाढतो व त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. समाजसेवक बाळासाहेब मांगले म्हणाले की, आमचे गाव समाजसेवक अण्णा हजारे व पन्न्नालाल सुराणा यांच्या विचाराने प्रेरित झाले असून शिक्षणाचे प्रमाण मोठे असून व्यसनाधीनता कमी आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की, शिबिरांमधून स्वयंसेवकामध्ये एकीची भावना निर्माण होते व ग्रामीण जीवनाचा अनुभव येतो तसेच अशा शिबिरामधूनच समाजामध्ये आदर्श नागरिक तयार होत असतात. शिबिरातील आठ दिवसामध्ये शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, कृषि विषयक व्याख्यान,श्रमदान,व्यसनमुक्ती इत्यादि उपक्रामधून जनजागृती केली. या शिबिरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन,महिला मेळावा,आरोग्य शिबीर, कृषि विषयक इत्यादि उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ अनंत पाटील यांनी केले.शिबीर अहवाल वाचन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ अशोक हुंबे आणि आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ नेताजी देसाई यांनी मानले. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.गोविंद चोरमले,प्रा.पांडुरंग आहेर,प्रा.डॉ.अश्विनी नवले, प्रा.डॉ चेतना जगताप, प्रा.प्रियांका गादेकर,प्रा.लोखंडे मॅडम, प्रा.प्रेरणा पाटील व प्रा.डॉ सुचित्रा जाधव,स्वप्निल शेलकांदे व चंद्रकांत घाडगे,सोहेल शेख यांनी परिश्रम घेतले.

 
Top