भूम (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित्त भूम नगरीतील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी भूम नगरीच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, युवा नेते साहिल गाढवे, डॉ. सई गाढवे तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू-भगिनींच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. साहिल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास नगरसेवक सुरज गाढवे, तोफिक कुरेशी, अभिजीत शेटे, तसेच मंगल नाईकवाडी, रिमा शिंदे, भाग्यश्री माने, मंगल आकरे, आक्कुबाई पवार, राणी वाडेकर, शितल शिंदे यांची उपस्थिती होती. यासह मुशीरभाई शेख, सुनील थोरात, बापू बाराते, योगेश आसलकर, काकासाहेब बोराडे, अतुल उपरे, किरण साठे, बाळासाहेब अंधारे, विष्णू शिंदे, बालाजी माळी, बंटी माळी, डॉ. आकाश भोसले, अमोल सरवसे, तानाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. दर्पण दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

 
Top