भूम (प्रतिनिधी)- भुम येथील बस स्थानकामध्ये चालक दिनानिमित्त भूम आगारातील चालकांचा आगार प्रमुख उल्हास शिंगारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चालक दिननिमित्त आगारातील सर्व चालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बस स्थानक प्रमुख श्रीकांत सुरवसे, एटीआय बालाजी मुळे, गणेश वाघमारे, अरविंद शिंदे, दादागिरी यांच्यासह चालक वाहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
