मुरुम (प्रतिनिधी)-  चित्रपट, साहित्य, नाटक आणि कथा लेखन ही क्षेत्रे केवळ छंद नसून करिअरची मोठी दारे उघडणारी आहेत. मेहनत, कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन असेल तर विद्यार्थ्यांना या क्षेत्रात नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना योग्य वेळी वाव दिली पाहिजे. प्रत्येकाला जीवनात संधी मिळत असते, या संधीचे सोने करता आले पाहिजे. नाटक हे अभिनयाचे मूळ माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार संजय कोथळीकर यांनी केले.

मुरूम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वयंशासन दिन व निरोप समारंभात शुक्रवारी (ता. 23) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. संजय गिरी, मुरूम शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वयंशासन दिनाचे कला शाखेच्या प्राचार्य प्रतीक्षा गावडे, वाणिज्य शाखेच्या रिया जाने, विज्ञान शाखेच्या वैष्णवी हिरमुखे, कला शाखेच्या उपप्राचार्य माही चव्हाण, वाणिज्य शाखेच्या सुजाता जोशी, विज्ञान शाखेच्या ज्ञानेश्वरी सुरवसे, पर्यवेक्षक रुपाली महामुनी, दिक्षा मुदकण्णा, श्रष्टी कट्टटे, स्नेहल येवले आदी उपस्थित होते. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी संजय कोथळीकर यांचा परिचय प्रा. विश्वजीत अंबर यांनी करून दिला. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी उल्हास घुरघुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुरुवर्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा कधीही विसर न पडता ते संस्कार, मूल्य घेऊन आयुष्यभर जगून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले पाहिजे. प्रा. सतिश रामपुरे, प्रा. अजित सूर्यवंशी, प्रा. अमोल गायकवाड, प्रा. बिभीषण बंडगर, प्रा. दिपक सांगळे, प्रा. रत्नदीप वाकडे, प्रा. नारायण सोलंकर, प्रा. दयानंद राठोड, प्रा. रेखा उण्णद, प्रा. सरस्वती तपसाळे, प्रा. माधुरी नरगिडे, प्रा. साक्षी महामुनी आदींनी पुढाकार घेतला. स्वयंशासनदिनी  विद्यार्थ्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या सांभाळून शालेय कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले. विद्यार्थ्यांनी वर्गनियंत्रण, प्रार्थनासभा, उपस्थिती व शिस्त राखण्याची जबाबदारी घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उमाकांत महामुनी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोटगे तर आभार सायली कांबळे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top