तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरामधील सर्व नाल्या, गटारी व परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करणे व कचरा घंटा गाडीची दररोज वेळेवर व्यवस्था करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून महा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली.
निवेदनात, तुळजापुर शहरामध्ये ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात घाणिचे साम्राज्य स्थापीत झाले असुन तुळजापुर येथील प्रत्येक नगरामध्ये सर्व गटारी, नाल्या, हे सर्व गहाण जावुन तुंबलेल्या असुन गटारीचे वाहणारे गहान पाणी हे सर्व रस्त्यावर वाहत आहे. तरी त्यापासुन मच्छरांची उत्पत्ती होऊन संबंधीत ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच सदरील घाणिचे साम्राज्य पाहुन येणारे भाविक भक्तांच्या दृष्टीकोनातुन तुळजापुर शहर हे अस्वच्छतेची छबी दिसत आहे. तसेच कांही ठिकाणी गटारीच्या चेंबर वरील झाकणे ही दुरावस्थेत असुन त्याची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच तुळजापुर शहरातील सर्व परिसर व सार्वजनिक स्वच्छतागृहे येथे स्वच्छता नसल्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरत आहे. तसेच मंजुर ठिकाणी करचरा कुंडीची स्वच्छता करणे व दररोज वेळच्या वेळी कचरा घंटा गाडी ही सर्व शहरामध्ये फिरणे यावी. तरी मे. साहेबांना विनंती आहे की, कृपया आपण तुळजापुर शहरातील सर्व नाल्या, गटारी व परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे हे लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावे. तसेच कचरा कुंडीची ही व्यवस्था लवकरात लवकर करावी हे निवेदन नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ, आनंद नानासाहेब जगताप, अक्षय धनंजय कदम, प्रगती गोपाळ लोंढे, रणजीत चंद्रकांत इंगळे यांनी दिले.
