धाराशिव (प्रतिनिधी)- उद्योगासाठी आवश्यक असणारे मुळ कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहायक आयुक्त कौशल्य विकास केंद्र धाराशिव संजय गुरव यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे काजळा येथे सुरू आहे. त्याप्रसंगी गुरव बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ संदीप देशमुख म्हणाले की, एन एस एस चे शिबिर हे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्याचे धडे देत असते. कारण इथे असंख्य विद्यार्थी जीवनाची कार्यशाळा म्हणून सहभागी होतात. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ दत्तात्रय साखरे, डॉ मोहन राठोड, डॉ अवधूत नवले, सर्व ग्रामस्थ, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम बंडगर, प्रास्ताविक ब्रम्हा गुरव आणि आभार सागर शिंदे या विद्यार्थ्यांनी केले
