भूम(प्रतिनिधी)- प्राईड इंग्लिश स्कूल, भूम येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अमेरिका येथील सॅन फ्रँसीस्को येथे स्थायिक पॅनमॅटिक इंटरनॅशनल कंपनी चे संचालक इंजि. मनोज दणाने यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन, विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
उद्घाटनप्रसंगी इंजि. मनोज दणाने यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन केले. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते. त्यामुळे अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शाळेचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपीका टकले यांनी केले. तर सूत्रसंचालन मेघा सुपेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मोनिका बोराडे यांनी मानले. क्रीडा महोत्सवात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांमध्ये क्रीडात्मक उत्साह पाहायला मिळणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, स्वप्नील सुपेकर आदींनी परिश्रम केले आहे.
