कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित संस्थामाता कै. सुमनबाई (वहिनी) मोहेकर जिल्हास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. बीडचे कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर होते.
या स्पर्धेत शालेय (42) आणि महाविद्यालयीन (16) अशा एकूण 58 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत,“ असे प्रतिपादन यावेळी रामराजे चांदणे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
शालेय गट- प्रथम: वसुंधरा संजय गुरव (धाराशिव), द्वितीय: राशी हनुमंत खोत (तेरखेडा), तृतीय: वीरेन गणपती आडसूळ (घारगाव), (उत्तेजनार्थ: रिया आडसूळ, ज्ञानेश्वरी धावडे, अमृता शिंदे, सुषमा मोरे, ईश्वरी बारस्कर)
महाविद्यालय गट- प्रथम: साक्षी बाळासाहेब वटाणे (मोहेकर महाविद्यालय), द्वितीय: प्रतीक्षा शिवाजी लिमकर (परंडा), तृतीय: समर्थ लक्ष्मण लोंढे (नळदुर्ग), (उत्तेजनार्थ: ऋषिकेश वाघे, अश्विनी गिरी, आकाश बारस्कर, आदित्य चव्हाण, सिद्धी पाटील)
परीक्षक म्हणून प्राचार्य महादेव गपाट, हरिश्चंद्र ओताडे, डॉ. गणेश पाटील, प्रा. सुनील भिसे, व्ही. एच. चेवले, सोपान पवार व मुस्तान मिर्झा यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. दीपक सूर्यवंशी , पारितोषिक वाचन डॉ. दादाराव गुंडरे यांनी केले, तर आभार श्री. अरविंद शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी किरण बारकुल , सारुख शेख, अक्षय खंडागाळे, संतोष मोरे, डॉ.जयवंत ढोले,डॉ.नामानंद साठे , डॉ. ज्ञानेश चिंते ,संदीप सूर्यवंशी , आदित्य मडके , उमेश साळुंके व महाविद्यालयातील विविध समित्यांनी परिश्रम घेतले.
