परंडा (प्रतिनिधी)- दारू उधार का दिली नाही असे म्हणून बिअर बार मालक व व्यवस्थापकाला लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शहरातील एका बिअर बारमधे घडली.
या प्रकरणी बिअर बार मालकाच्या फिर्यादीवरून चार लोकांवर परंडा पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14 जानेवारी रोजी सायंकाळी काशीमबाग येथील एका बिअर बारमधे रोहित भानवसे, बापू भानवसे, महेश भानवसे, अशोक भानवसे यांनी व्यवस्थापक जनार्दन चंदर भोळे यांच्याशी वाद घालून दारू उधार का दिली नाही या कारणावरून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच बिअर बार मालक बत्तीनी गौड हॉटेलमधे आले. त्यांनाही सदरील आरोपींनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.या घटनेत मालक आणि व्यवस्थापक दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा घडलेला प्रकार बिअर बारच्या हॉटेल च्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे.
या प्रकरणी बिअर बार मालकाच्या फिर्यादीवरून चार लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास परंडा पोलीस करित आहे.