भूम (प्रतिनिधी)-  शहरातील शेषेराव रेंगे यांची कन्या आणि ॲड. किशोर डोके यांच्या धर्मपत्नी सत्यवती किशोर रेंगे-डोके यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या निवडीनंतर त्यांनी शहराचे माजी नगराध्यक्ष संजय  गाढवे यांच्या सार्थक निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा संयोगिताताई संजय गाढवे आणि संजय गाढवे यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश सत्यवती रेंगे-डोके यांचा तुळजाभवानी देवीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. 

यावेळी गुरुवर्य शेषेराव रेंगे यांचा देखील नानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गुरुवर्य श्री रेंगे, किशोर डोके व न्यायाधीश सत्यवती रेंगे - डोके यांच्या हस्ते संयोगिता गाढवे यांची नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.आपल्या शहराच्या लेकीने न्यायदानाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारल्याबद्दल गाढवे परिवाराकडून त्यांचे कौतुक करत पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ॲड.पोपटराव गाढवे,ॲड.अमरसिंह ढगे,ॲड.पंडित ढगे,ॲड.अमित जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 
Top