परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, परंडा तालुकाच्या वतीने नुतन 2026 भाजपा दिनदर्शिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालय, परंडा येथे करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.जहीर चौधरी, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंहभैय्या ठाकूर, श्री. सुखदेव टोंपे, शिवाजीराव पाटील, नागेश शिंदे व्यंकटेश दिक्षित, दिनदर्शिकेचे प्रकाशक बाबासाहेब जाधव तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
