कळंब (प्रतिनिधी)-  स्व.गणपतराव कथले युवक आघाडी ही गेल्या अनेक वर्षापासून एक जानेवारी म्हणजेच नववर्षाला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते. हा उपक्रम स्तुत्य तर आहेच शिवाय याद्वारे शारीरिक तंदुरुस्तीचा महत्वाचा संदेश कळंबकरांना मिळतो हे विशेष असे प्रतिपादन हेमंत ढोकले (तहसिलदार, कळंब) यांनी कळंब मॅरेथॉन बक्षीस वितरण प्रसंगी केले. यावेळी ह.भ.महादेव महाराज आडसुळ, प्रा.विठ्ठल माने, प्रा.सतीश मातणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर सतपाल बनसोडे, प्रताप मोरे, गणेश करंजकर, मनोज चोंदे, स्वराज करंजकर, बापू भंडारे, अशोक चोंदे, शहाजी चव्हाण, अशोक शिंपले, मुकुंद नागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना हेमंत ढोकले म्हणाले की, व्यायाम ही काळाची गरज असून क्रीडांगणाशी मुलांचे व तरुणांचे नाते तुटत चालले आहे. नवीन वर्षात व्यायाम करण्याचे संकल्प अनेक जण करतात, मात्र त्याला मूर्त रूप देण्याचे काम स्व. गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कथले, सूत्रसंचालन राजेंद्र बिक्कड व आभार यश सुराणा यांनी मानले. ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कथले आघाडीचे बाळासाहेब कथले, राजेंद्र बिक्कड, शाम जाधवर, बाळासाहेब जाधवर, भाऊसाहेब शिंदे, पंकज कोटेचा, यश सुराणा, ओंकार कुलकर्णी, प्रवीण तांबडे, अशोक फल्ले, वैभव कोळपे, नवनाथ पुरी, धर्मराज पुरी, बंटी फल्ले यांनी परिश्रम घेतले.


चौकट -

हे ठरले कळंब मॅरेथॉनचे विजेते -

6 ते 15 वयोगट मुली- जान्हवी राऊत (प्रथम), प्रगती गायकवाड (व्दितीय), शिवक्रांती गायकवाड (तृतीय), 6 ते 15 वयोगट मुले- सोहम काळे (प्रथम), विवेक शिंदे (व्दितीय), प्रथमेश सुरवसे (तृतीय), खुला गट महिला-योगिनी साळुंके (प्रथम), परिमला बाबर (द्वितीय), संध्या डोंगरे (तृतीय), खुला गट पुरुष- विराज जाधवर (प्रथम), प्रसाद सुरवसे (द्वितीय), समीर शेख (तृतीय), जेष्ठ नागरिक गट - सुरेश काकडे (प्रथम), राजाभाऊ शिंदे (द्वितीय), प्रिया पवार (तृतीय).

 
Top