भूम (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आदर ठेवूनच समविचारी पक्षा बरोबर युती करण्याचा आणि अंतिम उमेदवार निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमिटी घेईल. कसल्याही स्थितीत प्रत्येक गड जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. असे आवाहन विधान परिषद माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत बोलताना केले .
बुधवार दि. 7 जानेवारी 2026 रोजी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने इच्छुक उमेदवार संदर्भात संवाद बैठक पक्षाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जे निवडणूक लढऊ ईच्छित आहेत अशा इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. यावेळी उमेदवारी मिळावी यासाठी 67 अर्ज दाखल केले आहेत. संवाद बैठकीसाठी तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, पंचायत समिती माजी सदस्य सिताराम वनवे, माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, महादेव वडेकर, सुदाम पाटिल, महिला तालुका महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे, बाजार समिती संचालक दमयंती जालनसह तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित लावली होती.
या संवाद बैठकी दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करून निवडणूक युती द्वारे लढवायची की, महायुती द्वारे लढवायची की, स्वतंत्र लढवायची या विषयावर मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकांनी राष्ट्रवादी बरोबरच युती करावी अशी विनंती केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूका अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी केले. तर सुत्रसंचलन शंकर खामकर यांनी केले. आभार नगरसेवक आबासाहेब मस्कर यांनी मानले.
