परांडा (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील बानगंगा (आयान) साखर कारखान्याने गाळप सुरू करून दोन महिने उलटले तरी आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले न दिल्यामुळे या कारखान्यावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजले पासून आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू होताच लागलीच कारखान्याचे संचालक मंडळ खडबडून जागे झाले व तात्काळ आंदोलक शेतकऱ्यांच्या बँक खात्याला रखमा जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले, त्यावेळी समाधान शिंदे, रणजीत शिंदे, परंडा तालुकाध्यक्ष अशोक कारकर, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष किरडे, विजय शिंदे, आकाश नवले, हनुमंत शिंदे, नागेश शिंदे, श्रीधर शिंदे, भूम तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खैरे, नितीन शिंदे, विजय डमरे, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, नारायण तनपुरे, बाबा सांगडे, अनिल शिंदे, विष्णु शिंदे, गणेश नवले, अश्रूबा मोरे, शहाजी अडसूळ, सत्यवान शिंदे, श्रीहरी शिंदे, सिताराम लोंढे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शंकर गायकवाड म्हणाले की, आज प्रति टन 2800 रुपये जमा करण्यात आले असले तरी पहिली उचल प्रति टन तीन हजार रुपये आमच्या मागणीप्रमाणे संचालक मंडळाने दहा दिवसात  देण्याचे कबूल केले असून उर्वरित दहा दिवसात न आल्यास पुन्हा गव्हाण व काटा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला यावेळी या कारखान्याचे एम.डी. संतोष तोंडले, शेतकी अधिकारी श्री. कुदळे, व्हाईस चेअरमनसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या आंदोलनाचा चूक पोलीस बंदोबस्त परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता.

 
Top