धाराशिव (प्रतिनिधी)- येथील हजरत ख्वॉजा शमशोदीन गाजी रहे. यांचा उरूस चालू झाला असून दर्शनासाठी भक्त महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भक्त येतात. त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, त्यांना निवासाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे त्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यासह भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सना महेमूद मुजावर यांनी एका निवेदनाद्वारे नूतन नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, हजरत ख्वॉजा शमशोदीन गाजी रहे. यांचा उरूस सुरू असून भाविकांना राहण्यासाठी मोठे हाल होत आहेत. तेथे निवास कामे अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तर यावर्षी भक्तांची संख्या देखील अधिक असणार आहे.  त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी. तसेच सर्व सामान्य भक्तांना भक्त निवास पूर्ण करून द्यावे. या यात्रेच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी घ्यावी अशी मागणी मुजावर यांनी केली आहे.

 
Top