धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती धाराशिव शाखेत दि. 30/12/2025 रोजी धाराशिव येथे व्यसनमुक्ती अंधश्रध्दा निर्मुलन व सभासद नोंदणी उपक्रम घेण्यात आला. यावेळी अनिसाचे राज्य सरचिटणीस उत्रेश्वर बिराजदार म्हणाले की, अनिस हे महाराष्ट्रात पंचसुत्रीनुसार कार्य करते. शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रध्दांना विरोध.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार,  प्रसार आणि अंगीकार करणे. धर्माची विधायक, कृतीशिल आणि कालसुसंगत चिकित्सा करणे, संत व समाजसुधारकांचे विचार आणि संविधानाचा मुल्य असे कृतीशिल करणे व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे. तेव्हा समाजातील युवक-युवती, स्त्री-पुरुष यांनी अनिसचे सभासद होवून डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करुया. अनिसचे सभासद होवून चळवळीचे भागीदार होवू असे आवाहन त्यांनी केले. यावेळीच संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते ॲड. अजय वाघाळे यांनी केले. याप्रसंगी लोखंडाच्या साखळीतून गोल कडी बाजूस करणे. एका प्रश्नचिन्हासारख्या हुकामध्ये बेल्ट करंगळीवर तोलून धरणे असे विविध प्रयोग करुन समाजात सामान्यांची कशी फसवणूक होते हे सप्रमाण दाखवून दिले. यावेळी ॲड. अरुणा गवई यांनी समाजात अंधश्रध्दांना बळी पडण्याचे प्रमाण स्त्रीयामध्ये जास्त आहे. तेंव्हा स्त्रीयांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुन जीवनात कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघटनेचे विजय गायकवाड यांनी संघटनेची भूमिका विशद करुन अनिसमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संघटनेचे सिध्देश्वर बेलुरे, अब्दूल लतीफ, गणेश वाघमारे, वामन पंडागळे, प्रशांत मते इत्यादींची उपस्थित होती.

 
Top