मुरूम (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ उमरगा तालुक्यातील भुसणी येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ शुक्रवारी (ता.30) रोजी करण्यात आला. 

याप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, सध्या राज्यावर उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने दुःखाचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती द्यायची असेल, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकवणे आवश्यक आहे. 

यावेळी ज्ञानराज चौगुले, शरण पाटील, कैलास शिंदे, रफिक तांबोळी आदींची भाषणे झाली. या प्रचार सभेस मुरूमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, भाजप अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, धनराज हिरमुखे, मल्लिनाथ हिरमुखे, गंपय्या स्वामी, प्रशांत गायकवाड, श्रीमंत पाटील, धुळप्पा पाटीप, शिवाजी संगशेट्टी, राजेंद्र व्हनाजे, बाबुराव बनसोडे, बालाजी संगशेट्टी, दशरथ माळी, धुळप्पा पाटील, महादेव पाटील, दिगंबर पांचाळ आदींची उपस्थिती होती. 

 
Top