तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मोर्डा येथील शेतकऱ्याने   द्राक्ष मळ्यातील पहिला द्राक्ष घड देवीचरणी  मंगळवार दिनांक 13 रोजी  अर्पण केला. श्री  तुळजाभवानी मातेच्या.भक्तात प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने असून शेतकरी आपल्या शेतातून आलेला पहिला  शेतमाल धान्य, फळे, फुले प्रथम देवीच्या वाहुन मगच ते खाण्यास व विक्री  करतात. या पार श्वभूमीवर  तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील शेतकरी गौतम आबा खताळ यांनी त्यांच्या शेतात आलेल्या द्राक्षबागेतील पहिल्या तोडणीतील द्राक्षे श्री तुळजाभवानी मंदिरात आणून देवीस वाहिले.

 
Top