भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी कार्यालय भूम येथे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वराज्यजननी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब  क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊंची शिकवण अंगीकृत करून जसे, शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोक यांना एकजुटीने एकसमान वागणूक दिली. तसेच आपण देखील आपल्या राजकीय कारकिर्दीत हीच शिकवण अंगीकार करावी असे त्यांनी सर्वांना सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, उबाठा महिला तालुका प्रमुख उमाताई रणदिवे, भाजपा शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ, काँग्रेस प्रियदर्शनी सेल अध्यक्ष अमृता गाढवे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष स्वाती तनपुरे,सोशलमीडिया शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, राणी यादव, शहर उपाध्यक्ष सुरेश उपरे,विकास यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top