धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढोकी पोलिसांना कसबे तडवळे येथील बस स्टॅडजवळील चिंचेच्या झाडाखाली काही इसम मटका जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी पोलिसांनी छापा टाकला असता फरीद तुरब खान (रा. कसबे तडवळे) हा कल्याण मटका जुगार चालवताना दिसून आला. यावेळी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच अधिक चौकशी केली असता बुक्की मालक महेश यादव मला कमिशन देतात, त्यामुळे मी येथे कल्याण मटका जुगार चालवत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. यानंतर ढोकी पोलिसांनी बुकी मालक महेश यादव व बुकी चालवणाऱ्या फरीद तुरब खानवर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांनी केली.