तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालयात विवेकानंद सप्ताहामध्ये जागर :आधुनिक शिक्षण आणि तात्रंतनाचा या व्याख्यानमाला अंतर्गत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षणातील नवीन प्रवाह” या विषयावर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथील  विभागाचे विभागप्रमुख प्रो.डॉ.संदीप टेकाळे यांचे एक दिवसीय मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते 

यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. संदीप टेकाळे (HOD, AIDS, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिक्षण क्षेत्रातील वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमाशी होणारा समन्वय, तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी  क्षेत्रात कौशल्ये विकसित करून नव्या संधी कशा साधाव्यात?  यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जीवन पवार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तंत्रज्ञानामुळे झपाट्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत नवकल्पना आवश्यक असल्याचे नमूद केले. कृत्रिम बुद्धिमात ही सर्व काही देत असेल तरी ती मानवास मूल्य देण्याइतके सक्षम नाही असे प्रतिपादन केले. ज्या ठिकाणी विकास झाला आहे त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने होतो. मूल्याची जोपासना करणे गरजेचे आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानास मूल्याची जोड द्यावी. असे आव्हान त्यांनी केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सज्जनराव साळुंखे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वाती पी. बैनवाड, विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग (सदस्य, महाविद्यालय विकास समिती) यांनी केले.  या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांची सखोल माहिती मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास डॉ.बापुराव पवार , डॉ. नेताजी काळे, संस्कृतिक विभागप्रमुख डॉ.मंत्री आडे, प्रा. बालाजी कऱ्हाडे , प्रा.सुदर्शन गुरव , डॉ. आबासाहेब गायकवाड, प्रा जे. बी. क्षीरसागर, प्रा सतीश वागतकर प्रा.राऊत सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश एकदंत यांनी केले सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top