धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या महीला सक्षमीकरण विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंकुर शिशुगृह धाराशिव येथे मायेची सावली हा एक अत्यंत अभिनव उपक्रम राबविण्यात आला. 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूसकी जिवंत आहे याचे प्रतिकात्मक उदाहरण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रकट होते. नकोशी असलेली लहान मुलं ज्यावेळी कायदेशीर रित्या सह्याद्रीच्या अंकुर शिशुगृहात आणली जातात तेव्हा तेथील वातावरण कसे असते. त्याचबरोबर सामाजिक सत्य काय असते याची जाणीव विद्यार्थ्यांनीना होणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या महीला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ स्वाती जाधव यांनी दिली. विद्यार्थीनींनी यावेळी कायदेशीर दत्तक प्रक्रिया काय असते,बाळ दत्तक गेल्यानंतर सुध्दा अंकुर कक्षातील कर्मचारी सतत त्या बाळाची आणि पालकांची कशा प्रकारे काळजी घेतात याबाबतचे सखोल ज्ञान प्राप्त केले. अंकुर कक्षातील क्षण हा भावूक करणारा क्षण होता अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनीनी नोंदवली. 

याप्रसंगी अंकुर शिशुगृहाच्या समन्वयक श्रीमती नीता बहिर यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, सामाजिक मुल्य यांचा परिचय विद्यार्थ्यांनीना फक्त व्याख्यानातुन नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आला. याप्रसंगी डॉ. सी. आर. दापके, डॉ. वैशाली बोबडे, डॉ. संजीवनी जाधव, डॉ. स्वाती जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top