उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस दर्पण दिन म्हणून मंगळवारी दि. 6 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार बालाजी माणिकवार अध्यक्षतेस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार मारूती कदम, नारायण गोस्वामी, बालाजी वडजे, महेबुब पठाण उपस्थित होते. या वेळी शरद गायकवाड, श्री. माणिकवार,श्री.कदम यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी अविनाश काळे,समिर सुतके,प्रा.युसुफ मुल्ला,प्रदीप भोसले,नसरुद्दीन फकीर,विठ्ठल चिकुंद्रे, विशाल देशमुख, आकाश पोतदार, लक्ष्मण पवार, महादेव पाटील,माधव सूर्यवंशी,नंदकुमार जाधव,रोहित गुरव,आदीनाथ भालेराव, गुणवंत पवार,दत्ता नांगरे,आकाश पोतदार,संभाजी पाटील,अमोल गायकवाड,बालाजी साने,तानाजी घोडके आदी पत्रकार उपस्थित होते. गुंडू दुधभाते यांनी प्रास्ताविक केले.अमोल पाटील यांनी सूत्रसंचलन तर गो.ल. कांबळे यांनी आभार मानले. 


 
Top