तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनामध्ये जागर :आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 20 : संधी आणि आव्हाने* विषयावर व्याख्याते :डॉ . रमेश चौगुले संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव तर प्रमुख पाहुणे : मा.आप्पासाहेब पाटील( महाविद्यालय विकास समित सदस्य) हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रो. डॉ. जीवन पवार प्राचार्य तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर .
प्रास्ताविक डॉ. मंत्री आडे यांनी केले यामध्ये कार्यक्रमाची माहिती दिली व विविध स्पर्धांमधून विद्यार्थी घडण्यात कशी मदत होते हे सांगितले .विवेकानंद सप्ताहाचे औचिते का, कसे गरजेचे आहे हे विशद केले विद्यार्थ्यांना मंच प्रदान करणे हे गरजेचे आहे .
आपल्या मनोगतात प्रो. डॉ.रमेश चौगुले यांनी भारताला महासत्ता बनवायचे असेल तर ज्ञानाचे महासत्ता अगोदर बनले पाहिजे हे सांगितले . नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वीची शैक्षणिक पद्धती व आताचे नवीन शैक्षणिक धोरण यामधील फरक सांगितला. शैक्षणिक क्षेत्रातील लवचिकता कशी आहे व शिक्षणात आधुनिक बदल व कौशल्यावर असल्याचे सांगितले .आहेत हे सांगितले . शैक्षणिक धोरणामध्ये भाषांतराच्या संधी देखील आहेत .भारताला महासत्ता बनवण्यासाठी उच्च शिक्षण आमुलाग्र बदल केलेला आहे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असा फरक न करता कोणताही विद्यार्थी विविध शाखेचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना आहे .नवीन शैक्षणिक धोरणात जागतिक शिक्षण घेण्यासाठी मदत नवीन तंत्रज्ञानामुळे होते. नियम तंत्रज्ञानाची मदत घेतल्यामुळे एखाद्या विद्यार्थी अमेरिकेतील शिक्षण देखील घेऊ शकतो आणि शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांची सर्व समावेशक प्रगती होते म्हणून शैक्षणिक धोरण 2020 चा स्वीकार केला आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणात प्रथम वाचून संशोधनाची पद्धती देण्यात आली आहे पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण देखील नवीन शैक्षणिक धरणात आहे .वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी निधी दिला जातो त्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन निर्माण केली आहे आत्ताच्या शिक्षण पद्धती शिक्षक केंद्रित नसून विद्यार्थी केंद्रित आहे .
नवीन शैक्षणिक धोरण असणाऱ्या त्रुटी सांगताना शिक्षणात पैशाची तरतूद कमी असल्याचे सांगितले नवीन तंत्रज्ञान वापर करण्याची कौशल्य शिक्षणात नसल्याचे सांगितले म्हणून सर्वांनी नवीन तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे तसेच ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची कमतरता आहे नवीन शिक्षणात संधी आहेत पण आव्हाने देखील आहेत असे सांगितले .अध्यक्ष मनोगतात प्रोफेसर डॉ. जीवन पवार यांनी विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली तसेच सप्ताहामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. उद्याच्या भारताचे भविष्य हे सर्व विद्यार्थ्यांच्या हातात आहे असे सांगितले नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा डॉ.कस्तुरी रंजन इस्रो माजी अध्यक्ष यांनी सादर केला असल्याचे सांगितले भारताला महासत्ता बनवण्याचे सूत्र हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे .असे प्रतिपादन केले .आपल्या भारताचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 खेळाची अंमलबजावणी केली आहे आपल्या परकीय आक्रमणामुळे आपल्या गत वैभव रास पावले होते म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी गरजेचे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन : प्रा . कोरे मॅडम तर प्रा. तांबोळी मॅडम यांनी आभार मानले . सदर कार्यक्रमास डॉ.प्रा.बापू पवार डॉ.नेताजी काळे प्रा. बालाजी कऱ्हाडे प्रा.स्वाती बैनवाड तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
