तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने तुळजापूर शहरातील लातूर रोड चौकास “राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊ चौक” असे नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समिती, तुळजापूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त संबंधित चौकात जिजाऊ मातांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी जिजाऊंच्या विचारांना व कार्याला उजाळा देत चौक नामकरणाची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर रोड चौकाला जिजामाता चौक असे नामकरण करून आज पाच वर्ष होत आले तरी आज पाच वर्षे झाले अधिकृत नामाकरण करण्यात आलेले नाही. सदर चौकाचे अद्याप अधिकृत नामकरण झालेले नसून, शहरातील एक महत्त्वाचा व वर्दळीचा चौक असल्याने राजमाता जिजाऊंच्या नावाने नामकरण झाल्यास पुढील पिढीला प्रेरणा मिळेल तसेच इतिहासाचे स्मरण कायम राहील.
या उपक्रमावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौक नामकरणाचा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रमाता राजमाता मॉ जिजाऊ साहेब यांची जयंती नियोजित राजमाता जिजाऊ चौक येथे तुळजापूर शहरवासियांच्या वतीने जिजाऊंना वंदन करून, पेढे भरवून साजरी करण्यात आली. तसेच गेली पाच वर्षापासून राजमाता जिजाऊ चौक यासाठी पाठपुरावा सुरू आहे आणि यासंदर्भात लवकरात लवकर नगरपरिषदेच्या वतीने अधिकृत राजमाता जिजाऊ चौक होण्याकरिता मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे महेश गवळी अजय साळुंखे धैर्यशील कापसे,अर्जुन साळुंके कुमार टोले, अण्णा क्षीरसागर, जीवन राजे इंगळे,प्रशांत इंगळे, दत्ता सोमाजी, विशाल साळुंके, अक्षय साळवे, परीक्षित साळुंके, संतोष भोरे, बबन गावडे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

