धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाअंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत धाराशिव रोटरी क्लब तर्फे निमजाई न्यूएरा प्रा. लि. येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रोटरी लोगो असलेले 100 रिफ्लेक्टर बसवण्यात आले.
रात्रीच्या वेळी व कमी प्रकाशात ऊस ट्रॉली स्पष्टपणे न दिसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते. अनेक ट्रॉलींवर रिफ्लेक्टर किंवा दिव्यांचा अभाव, तसेच अतिवेग व निष्काळजी वाहनचालक ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्रात ऊस ट्रॉलींना मागून धडक बसून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या उपक्रमामुळे एक जरी जीव वाचू शकला, तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही, असे मत रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजित रणदिवे यांनी व्यक्त केले. या वेळी रोटरी अध्यक्ष रणजित रणदिवे, सचिव प्रदीप खामकर, रोटरीयन चित्रसेन राजेनिंबाळकर व रोटरीयन सुरज कदम उपस्थित होते.
