भुम (प्रतिनिधी)-आज रविंद्र हायस्कूल,भूम येथे सावित्रीबाई फुले जयंती  व बालिका दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रम घेण्यात आले.. जेष्ठ शिक्षिका अंधारे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीतांच्या व भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. आज कश्याप्रकारे सावित्रीच्या लेकी अनेक क्षेत्रात यश संपादन करत आहेत, यावर गाण्याच्या व नाटीकेच्या माध्यमातून दाखवून दिले. या प्रसंगी  उपमुख्यध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, मुख्याध्यापक श्री. उत्तम सुरवसे सर, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर, भागवत लोकरे सर, धनंजय पवार सर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top