तुळजापूर (प्रतिनिधी)- २८ डिसेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ झालेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाची आज पारंपरिक विधीने घटोत्थापन करून सांगता करण्यात आली. सात दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

शाकंभरी नवरात्र काळात देवीची विशेष पूजा तसेच विविध धार्मिक विधी मंदिरात भक्तिभावाने पार पडले. या नवरात्र काळात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले. आज दुपारी मंदिरात घटोत्थापनाचा विधी पार पडला. यावेळी मंदिरातील होमामध्ये कोहळा व नारळ यांची पूर्णाहुती देण्यात आली. या विधीमुळे शाकंभरी नवरात्र उत्सवाची विधिवत सांगता झाली. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, यजमान उल्हास कागदे, उपाध्ये बंडू पाठक, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी व पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top