धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचा संशोधक विद्यार्थी यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर या अभ्यासक्रमाबरोबरच अनेक विषयांची संशोधन केंद्र आहेत. हिंदी विभागातील संशोधन केंद्राचे विद्यार्थी डॉ. बनसिंग भोई यांनी विशेष सहकार्याबद्दल प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बनसिंग भोई हे हिंदी विभागप्रमुख प्रो.डॉ.केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पीएच.डी. करत आहेत. याप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.माधव उगिले, प्रा.शरद लोंढे, दादा माळी उपस्थित होते.
