भूम (प्रतिनिधी)-  रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल भूम, नुकतेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद मेळावा (फन फेअर) या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मनोरंजनाबरोबरच विक्री कौशल्याचे धडे घेतले.

रायझिंग स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आवारात राबवलेल्या या  बाल आनंद मेळावा (फन फेअर) उपक्रमात नर्सरीच्या वर्गापासून ते इयत्ता 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  सुर्यकांत कांबळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमारे 30हून अधिक स्टॉल्स उभारले होते. प्रत्येक स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतः सजवून त्यावर किमती लिहिल्या होत्या. ग्राहकांशी संवाद साधत विक्री करताना, विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण अनुभव मिळत होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांसह ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशाचे महत्त्व, खरेदी-विक्रीची पद्धत, नफा-तोटा याची ओळख करून देणे हा होता. दरम्यान या उपक्रमाच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापक हरिष धायगुडे प्राचार्या भाग्य जैन, शीतल बावकर सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top