धाराशिव (प्रतिनिधी)-  हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांच्या उरूस निमित्त अरब गल्ली येथून मानाची संदलची मिरवणूक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या डोक्यावर संदल देऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी सय्यद सरफराज अब्दुल्लाह हुसेनी सज्जादे नशिन मूत्तवल्ली, सय्यद शफीक रफिक हुसेनी सज्जादे,इकरामुल्ला हुसेनी सज्जादे, पटेदार जफर मुजावर, सद्दाम पाशा फराश, जिल्हा वक्फ अधिकारी आमेर सय्यद, अतिकउल्ला हुसेनी,मोहसीन शेख, यांच्यासह सर्व मानकरी तसेच खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते. 

उरूसानिमित्त शहरातील विविध चौकात लाईटींग करण्यात आली आहे. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) गाझी मैदानात विविध प्रकारचे आकाश पाळणा, खेळणी व विविध वस्तूंची दुकाने दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथून आले आहेत. उरूसानिमित्त आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. उरूसानिमित्त काही धार्मिक विधीमध्ये हिंदू समाजातील काही व्यक्तींना मान आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून या उरूसाकडे पाहिले जाते. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांच्या दर्ग्यावर आकर्षक अशी लाईटींग करण्यात आली आहे. 

 
Top