धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील गुळ पावडर उत्पादक कारखान्यांची संघटना इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांची मासिक बैठक धाराशिव येथील अँपल हॉटेल येथे यशस्वीपणे पार पडली.
या बैठकीत चालू ऊस गाळप हंगामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गुळ पावडर उत्पादक कारखान्यांच्या गाळपाची सद्यस्थिती, उपलब्ध ऊस, उत्पादन खर्च तसेच बाजारातील मागणी-पुरवठा यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच येत्या काळातील ऊस गाळपाचे नियोजन, गुळ पावडर विक्रीसाठी किमान व योग्य दर, आर्थिक शिस्त, बाजारातील स्पर्धा, वाहतूक व साठवणूक व्यवस्थापन, कामगार सुरक्षितता आदी विषयांवर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस इजमाचे कार्यकारी अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील, श्री सिद्धीविनायक समूहाचे संस्थापक तथा सचिव दत्ता कुलकर्णी,उपाध्यक्ष तथा डी.डी.एन. समुहाचे चेअरमन विजय नाडे, कोषाध्यक्ष तथा एस.एम.डी. समूहाचे चेअरमन हणुमंत मडके, तज्ज्ञ संचालक प्रविण प्रजापती, कुलस्वामिनीचे संस्थापक मधुकर तावडे, चेअरमन आकाश तावडे, तुळजाभवानी शुगरचे चेअरमन अनिल काळे, हणुमान खांडसरीचे चेअरमन रामनिवास अग्रवाल, रुपामाता पॉवरचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड, दत्तकृपा चे चेअरमन शरद पाटील, निमजाई चे चेअरमन मकरंदराजे राजेनिंबाळकर, साईप्रसाद शुगरचे चेअरमन बबनराव गवते, गुलमेश्वर शुगरचे व्हाईस-चेअरमन सिद्धेश्वर वायकर, बळीराजा ॲग्रोचे चेअरमन एकनाथ चाळक, शिवाजीराव ॲग्रोचे चेअरमन रविंद्र काळे, आशापुरक ॲग्रोचे संचालक वरद चरखा, गोपाळबुवा शुगरचे संचालक राजेश कराड, युके फार्म्सचे चेअरमन ओंकार खुर्पे, सोनाई अँग्रोचे चेअरमन प्रा. टी. पी. मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी चालू ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व सभासदांनी परस्पर सहकार्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80%20%20%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%20%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8..jpeg)