परंडा (प्रतिनिधी)- सकाळ समूहाच्या वतीने सकाळ रिलीफ फंडातून “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रम्हगांव ता परंडा जि धाराशिव“ या शाळेत पाण्यचा बोअर घेणे, बोअर चा पंप घेणे,पाण्याची टाकी,प्लंबिंग काम करणे,क्रिडा साहित्य खरेदी करणे या कामासाठी निधी रु.125,000/- मंजूर झाला आहे.

शाळेच्या या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सकाळ समूहाच्या वतीने केलेली मदत ही शाळेच्या गुणवत्ता विकास,भौतिक सुविधा विकसित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असणे खूप आवश्यक आहे. सकाळ समूहाच्या या उत्कृष्ट सामाजिक उपक्रमामुळे जि.प.प्राथमिक शाळा ब्रम्हगांव ता.परंडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चित सुधारणा होऊन शाळेची विद्यार्थी संख्या वाढणार आहे.शाळेत पाण्याची सुविधा निर्माण झाल्यामुळे स्वच्छता व आरोग्य या बाबतीत विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.  बुधवार दि.21 रोजी पाण्याचा बोअर घेण्यात आला.

सदर बोअर ला मुबलक 3 इंची पाणी लागल्यामुळे शाळेतील पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह,किचन,झाडे, परसबाग , मैदान तयार करणे, वेळोवेळी वर्ग स्वच्छ करणे या गोष्टींसाठी खूप फायदा होणार आहे.असे मत मुख्याध्यापक यांनी केले तसेच निश्चितच शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढ होणार आहे. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, उपाध्यक्ष महादेव हिंगणकर, बाळासाहेब हिंगणकर,राजेश गायकवाड,पोपट ओव्हाळ, अमोल गायकवाड, बाळासाहेब जाधव,मारुती शिंदे, महादेव खबाले,तानाजी सांगडे, सचिन गायकवाड, अंकुश भोसले,विजय जाधव मुख्याधपक लहु मासाळ, सविता येवले, सुषमा चव्हाण, अलका ओव्हाळ उपस्थित होते.


 
Top