धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही.पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त कॅम्पसमधील विविध शैक्षणिक विभागांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित विचार मांडणी, मार्गदर्शनपर कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमास कॅम्पसचे प्रशासकीय अधिकारी व एसबीएनएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, एस.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, आर.पी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, नीलकंठेश्वर डेअरीचे प्राचार्य बालाजी वाघमारे, वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य  डॉ. पूजा आचार्य, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, आयटीआयचे व्यवस्थापक प्रा. दत्तात्रय घावटे, कॅम्पसचे लेखापाल योगेश मंडलिक यांच्यासह कॅम्पसमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

 
Top