तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मसला खुर्द येथे सुरू आहे. या शिबिरात आज सर्व स्वयंसेवकांनी सकाळी प्रभात फेरीने सुरुवात केली प्रभात फेरीमध्ये स्वच्छतेविषयी घोषणा देऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे बॅनर हातात धरले होते. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान केले श्रमदान करत असताना गावातील मुख्य रस्ता, अंगणवाडी परिसर ,अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ,मंदिर परिसर ,स्वच्छ करून घेतले व ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर झालेल्या उद्भोधन व्याख्यानात सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे या विषयावर कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरबाड यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे, महत्व सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात होणारी वाढ रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम ,गांडूळ खत निर्मिती शेतीसाठी कशा पद्धतीने सुपीक व महत्त्वाची आहे व रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीचे होणारे नापीकीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ स्वयंसेवक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतीश वागतकर तर आभारप्रदर्शन प्रा कुकडे बी जे यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिगंबर खराडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गोकुळ बाविस्कर, कार्यक्रमाधिकारी प्रा बैलवाड स्वाती, बाळासाहेब राऊत , प्रा निलेश एकदंते ,प्रा सतीश वागदकर तसेच कदम आणि गावातील ग्रामस्थ महाविद्यालयातील कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
