तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात मक्रर संक्रांत सणाच्या दुसऱ्या दिवसानंतर आता सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रमाची धूम सुरू झाली असून, किंक्रांती दिनी श्री तुळजाभवानी मातेस विशेष अलंकार पूजा मांडण्यात आली होती. गुरुवारी महिलांनी एकमेकांच्या घरी जाऊन हळदीकुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवला बुधवारी मकर संक्रांत निमित्त श्री तुळजाभवानी मातेस आज खास विशेष बनवण्यात आलेला हलव्यांच्या दागिन्याचा हार घालण्यात आला होता. आज मंदिर मुख्य गर्भ गृह फुलांनी सजवण्यात आले होते. अखंड सौभाग्यासाठी वाणवसा देण्याची ही अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आजही सुवासिनी महिला श्रद्धेने पाळत असल्याचे चित्र दिसून आले.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने मराठवाड्यातील  विविध भागातील सुवासिनी महिला मोठ्या संख्येने श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाल्या होत्या. अनेक महिलांनी प्रथम पंढरपूर येथे श्री रुक्मिणी मातेला वाणवसा अर्पण करून त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या चरणी वाणवसा अर्पण केला व नंतर आपल्या गावी परतल्या. या पावन सणाच्या पार्श्वभूमीवर आज श्री तुळजाभवानी मातेस हलव्याच्या दागिन्यांचा हार अर्पण करण्यात आला होता. 

 
Top