धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाच्या वरून धर्म या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित कंपोस्ट खत निर्मिती मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 -26 तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापूर येथे दिनांक 12 व 13 जानेवारी 2026 आयोजित करण्यात आलेले होते. या विज्ञान प्रदर्शनात आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयातील वरून समीर धर्म या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकवला असून त्याच्या स्मार्ट मल्टीटास्किंग डस्टबिन या मॉडेलची आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
ही डस्टबिन हवी त्या ठिकाणी आपोआप मुव्हेबल आहे. या मल्टी टास्किंग डस्टबिन मध्ये घरगुती कचऱ्याचे ओला व कोरडा कचरा विभाजन करून त्यात कचरा कमीत कमी वेळात कंपोस्ट मध्ये रूपांतर केला जातो. अशा या टाकाऊ कचरा व्यवस्थापन व पर्यावरण पूरक मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्याला विज्ञान शिक्षिका शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल वरून समीर धर्म याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
