तुळजापूर (प्रतिनिधी)- रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन व विकासकामांना पायाने लाथा मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींचा उघड अपमान केल्याचा गंभीर आरोप करत, लौकिक गोळे याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. 

याबाबत शिवप्रेमींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लौकिक गोळे याने रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धनात्मक व विकासात्मक कामांच्या ठिकाणी जाऊन चालू अवस्थेतील बांधकामांना पायाने लाथा मारल्या. एवढ्यावरच न थांबता, या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते जाणीवपूर्वक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले.

शिवप्रेमींनी हा प्रकार अपघाती नसून पूर्वनियोजित व हेतुपुरस्पर असल्याचा ठपका ठेवला आहे. या व्हिडिओंमुळे राज्यभरातील शिवभक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, यावर तात्काळ कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईची मागणी करणाऱ्यांमध्ये शिवप्रेमी जीवनराजे इंगळे, महेश गवळी, औदुंबर जमदाडे, सुदर्शन दळवे, प्रताप पठाडे, संतोष पठाडे, गणेश माळी, नागनाथ बचाटे यांचा समावेश आहे.


 
Top