धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे ‘आनंद मेळा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.
या आनंद मेळ्याचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव सरचिटणीस प्रेमाताई पाटील, यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुळाताई पाटील, श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे तसेच वाहतूक संघटनेचे दादासाहेब गवळी, संतोष विधाते, निसार पटेल, बापू गायके उपस्थित होते.
या आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे 170 स्टॉल्स, हस्तकला, खेळणी, भाजीपाला व शैक्षणिक उपक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक व नागरिकांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच संजय जाधव, राम मुंडे, रामराजे पाटील, शितल देशमुख, सुजित वाडकर कार्यक्रमास इतर शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
