धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने राज्यात आपला स्वतःचा असा वेगळा पॅटर्न तयार केला असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीबरोबर शारिरीक, मानसिक, सांस्कृतिक विकासाकरिता विविध उपक्रम प्रशालेमध्ये राबविले जातात. या अंतर्गत सालाबादाप्रमाणे याही वर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्लाईंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुळा आदित्य पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गुरुवर्य के .टी. पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आपल्या प्रास्ताविकेत प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी विदयार्थी जीवनात कला, क्रीडेचे असणारे महत्त्व मुलांना सांगितले. त्यानंतर क्रीडा स्पर्धेतील संगीत खुर्ची या खेळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडा सप्ताहात संगीत खुर्ची, स्लो सायकलिंग, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धा सह विविध स्पर्धेचे आयोजन प्रशालेतील मैदानावर करण्यात आले आहे.
याचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख पी.टी. बागल तर सहाय्यक म्हणून शशिकांत जाधव, आर.पी. पवार सह सर्व शिक्षकांनी म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, नूतन प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील कोरडे, बी.बी. गुंड, बी. एम. गोरे, प्रा. विनोद आंबेवाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. पी. पाटील यांनी केले. तर आभार ए. व्ही. शेंडगे यांनी मानले.
