धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे  कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे  महाराष्ट्रामध्ये धडाडीने काम करणारे सर्वांना सोबत घेऊन जाणारे पहाटेच उठून लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे गोरगरीब सर्वसामान्यांची छोटी मोठी कामे करणारे अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करून सर्वांना न्याय मिळवून देणारे स्पष्टपणे बोलणारे आव्हान स्वीकारून काम करणारे जनतेचे आधारवड अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्रामध्ये त्यांनी विविध पदावर काम करून सरकारच्या व सहकाराच्या माध्यमातून शेतकरी तरुण महिला अशा अठरा पगड जातीतील लोकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विमान अपघाताने दादांना देवाज्ञा झाली दादांच्या जाण्याने आपल्या राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

रामदास कोळगे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव 

 
Top