भूम (प्रतिनिधी)- भूम शहराचे नूतन नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे आणि त्यांचे नगरसेवक यांचा सत्कार आणि दर्पण दिननिमित्त भूम शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती भूमच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पुढील काळात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भातही शिवसेना शिंदे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र येत निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी कार्यक्रम वेरी बोलताना सांगितले .तसेच माजी सभापती अण्णासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्याकडे सर्वांनी मिळून पाठपुरावा करून पुढील काळात बाजार समिती चांगल्या नावारूपास आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे .
नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यावेळी बोलताना म्हणाल्या की भूम शहराच्या विकासासाठी आलम प्रभू शहर विकास आघाडी आणि आम्ही कटिबद्ध आहोत. नगराध्यक्षपदाचा अधिकार पूर्णपणे वापरून भूम शहरातील विकास कामे अधिक गतीने करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील होतो आणि पुढील काळातही राहू असे यावेळी नूतन नगराध्यक्ष गाढवे म्हणाल्या. कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, अण्णासाहेब देशमुख, माजी सभापती शेळवणे, संचालक तथा सरपंच विशाल बापू ढगे, विशाल अंधारे, सहदेव गोपने, सातव समाधान, वैजीन नाथ म्हमाने, बालाजी काका तांबे, माजी पंचायत समिती उपसभापती रामकिसन गव्हाणे, दत्तात्रय गायकवाड, उद्योजक संजय साबळे, बाळासाहेब सुर्वे, रईस काजी, नगरसेवक सुरज गाढवे, अभिजीत शेटे, मंगल नाईकवाडी, राधा शिंदे, शितल शिंदे, मुशीर शेख, बापू बाराते, महिला जिल्हाप्रमुख अर्चना दराडे सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
