धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर रोड,धाराशिव येथे भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये व संविधानाचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीतगायन व प्रेरणादायी विचार मांडले. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, एसबीएनएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे, आरपी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गाझी शेख, एस पी पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, वेलनेस फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. पूजा आचार्य, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, डेअरी महाविद्यालयाचे प्राचार्य,कृषि महाविद्यालय तसेच आय टी आय व संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.


 
Top