भूम (प्रतिनिधी)- सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या मध्ये मोबाईल चे व्यसन वाढत चालले असून त्यांना त्यांना यापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील युवक पुढाकार घेत असलेले चित्र दिसून येत आहे. विद्यार्थांना शालेय शिक्षणाबरोबर अवांतर वाचनात भर पडावी, सामान्यज्ञान वाढ व्हावी म्हणून पुणे येथील सामाजिक, शैक्षणिक कार्य करणारे चेतन परदेशी यांनी “एस फॉर स्कूल्स“ या संस्थेची स्थापना आपले सहकारी उद्योजक ऋषभ गादीया, अमेरिकेतील एक आय टी इंजिनियर तेजस घाणेकर यांच्या मदतीने केली. ही संस्था ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फिरते ग्रंथालय उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात दोनशे हून अधिक शाळेत मोबाईल लायब्ररी उपक्रम सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून परांडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोबाईल लायब्ररी शुभारंभ पिंपळवाडी बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत बेळे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोबाईल लायब्ररी मध्ये विद्यार्थ्यांसाठी कथा, कादंबरी, बोधकथा पुस्तके, व्यक्ती चरित्रे, कॉमिक्स, चित्रमय चरित्रे, कविता संग्रह, फिक्शन, नॉन फिक्शन, रहस्य कथा विज्ञान कथा ,कल्पना कथा आत्मचरित्रे इतिहास ,आत्म सुधारणा, शैक्षणिक गणिते, ऐतिहासिक कथा ,प्रवास वर्णने विज्ञान आणि तंत्रज्ञान ,नाटके शब्दकोश, चिल्ड्रन्स बुक इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. मोबाईल लायब्ररी चाउपयोग इतर ही शाळांना होणार आहे.
परांडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक, खासगाव, नालगाव, साकत बुद्रुक, त्याचप्रमाणे अंधारेवस्ती माणकेश्वर तालुका भूम येथील शाळेत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शाहेदा हुसेनी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख प्रदीप खराडे, निरंतर शिक्षण चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंकुश डांगे, उद्योजक सचिन मांजरे, महेश काका ठोंगे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक उज्वला बावकर यांनी केले तर आभारप्रदर्शन राहुल अंधारे यांनी केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही हिंदी इंग्रजी मराठी पुस्तके लायब्ररीच्या माध्यमातून भेट दिली आहेत.
चेतन परदेशी
संस्थापक एस फॉर स्कूल्स.
%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%20%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD.jpg)